अनधिकृत बांधकामाची चौकशी करा घाडीगांवकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

अनधिकृत बांधकामांसाठी गोल्डन गॅंग कार्यरत,ठाण्यातील अनधिकृत बांधकामाची चौकशी करा

काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र 

ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासकीय व खाजगी जमिनीवर अवघ्या सहा सहा महिन्यात निर्माण झालेली आणि आता निर्माणाधिन अवस्थेत असलेली अन अधिकृत इमारतीना जबाबदार कोण? नगर रचना आणि गृहनिर्माण मंत्री ठाण्याचे असताना ठाणे शहरात अनधिकृत बांधकामाचा शिक्का का लागतोय असा सवाल करत काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांनी पालिका अतिक्रमण उपायुक्त व संबंधित अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

ठाण्यात वाढत्या अनधिकृत बांधकाम मागे संघटित पणे अनधिकृत बांधकाम सम्राट,अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची टोळी कार्यरत असून या गोल्डन गँगवर कारवाई करा अशी मागणी घाडीगांवकर यांनी केली आहे.ठाणे शहरात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकाम व त्यांना असणाऱ्या प्रशासकीय अभय बाबत घाडीगांवकर यांनी नुकते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  पत्र लिहिले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सन 2019 पासून 6- 6 महिन्यात निर्माण झालेली आणि निर्माणाधीन अवस्थेत असलेली अन अधिकृत इमारतीच्या बांधकामाची स्पर्धा कळवा, मुंब्रा ,दिवा ,माजिवडा मानपाडा ,वर्तक नगर ,नौपाडा कोपरी प्रभाग समिती आणि उथळसर प्रभाग समिती अंतर्गत आजही बिनधास्तपणे विनापरवानगी अन अधिकृत इमारतींची बांधकामे जोरात चालू आहेत हे अन अधिकृत इमारतींची बांधकामे करणारे विकासक आणि संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या कृपाशीर्वादाने चालू आहेत.असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

सबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या कर्तव्यातील कसूरीमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साईराज ,अनुपम निवास,आणि लकी कंपाऊंड दुर्घटना होवून झालेली  वित्त आणि जीवित हानी 6-6 महिन्यात निर्माण होणाऱ्या अन अधिकृत इमारतींच्या बांधकामाचे परिणाम असताना पुन्हा त्या काळ्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती करीता  विकासक ,शासकीय अधिकारी आणि राजाश्रय देणारे राजकीय नेते यांच्या मुळेच पुन्हा ही जिव घेणी स्पर्धा चालू असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

 ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा येथील साबे गाव सर्वे नंबर 56 79,80 ,तसेच तेथील गुरुचरण असलेले विविध शासकीय  भूखंड ,कळवा खारेगाव मधील गोपीनाथ पाटिल मार्ग  परिसरात भर रस्त्यात,आणि भर वस्तित तसेच शासकीय जमिनीवर ,तलाव बुझवून, आणि मँनग्रोज काढून अन अधिकृत इमारतीची बांधकामें चालू आहेत. ह्याच प्रमाणे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती,वर्तक नगर प्रभाग समिती,नौपाडा कोपरी प्रभाग समिती आणि उथळसर प्रभाग समिती अंतर्गत आजही अन अधिकृत इमारतींची बांधकामे बिनधास्त चालु आहेत. याकडे संजय घाडीगांवकर यांनी लक्ष वेधले आहे.

ठाण्यातील अनधिकृत बांधकामे पहिली की हे असे कोणते नगरविकासाचे काम वा गृहनिर्माणाचे काम चालू आहे असा प्रश्न पडतो. ठाण्यात 2 कैबिनेट मंत्री असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि विधानसभा मतदारसंघात स्थानिक प्रशासन कारवाई का करीत नाही ? असा सवाल त्यांनी केला आहे.
पुराव्या निशी ,वीडियो निशी लेखी तक्रारी आल्या  असतानाही महापालिकेचे उप आयुक्त अतिक्रमण मुख्यालय अशोक बुरफुले  सबंधित कर्तव्यातील दोषी असलेले  सहा आयुक्त यांचेवर कारवाई साठी कोणतेही प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्तांकड़े सादर करीत नाहीत वा स्वतः अतिक्रमण तोडण्या साठी पुढाकार घेत नाहीत याबाबत घाडीगांवकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सर्व निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या सर्व अन अधिकृत इमारतीच्या बांधकाम करणारे विकासक स्वत: मंत्री महोदय,महापालिका आयुक्त  आहेत आणि म्हणून कारवाई नाही होत आहे का ? ठाण्यात MMC Act 1949 आणि MRTP ACT 1966 लागू नाहीत का ? हे  प्रश्न इथे निर्माण झालेले आहेत..असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

म्हणून राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री या नात्याने आपण स्वतः या शासकीय तथा खाजगी भूखंडावर सर्व निर्माण झालेल्या निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या अन अधिकृत इमारतीच्या बांधकामावर 15 दिवसात पूर्ण जमीनदोस्त करण्यासाठी सबंधित सर्व शासकीय प्राधिकरणाना संयुक्त कारवाई घेण्यासाठी आणि हेतूपुरस्पर कर्तव्यात कसूर करणारे संबंधित ठाणे महापालिका उप आयुक्त अतिक्रमण मुख्यालय अशोक बुरफुले  आणि सहा आयुक्त सचिन बोरसे सारख्या सर्व अधिका-याना सेवेतुन बड़तर्फ करण्यासाठी तात्काळ ठाणे महापालिका आयुक्त  विपिन शर्मा यांना आदेश देवून सबंधित आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल मागवून घ्यावा अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडून जीवित व वित्त हानी झाल्यास उपरोक्त आपण सर्वजण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असा इशारा त्यांनी या पत्रात दिला आहे.

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.