मालवणी येथे घर कोसळून ८ मुलांसह ११ जण मृत ७ जण जखमी

मुंबई – मालाड, मालवणी येथे बुधवारी रात्री उशिराने एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. त्यांपैकी ११ जणांचा मृत्यू तर ७ जखमी आहे. यामध्ये, ३ ते १५ वयोगटातील ८ मुलांचा, २ महिला व १ पुरुष यांचा समावेश आहे. तर उर्वरित ७ जखमींमध्ये , ४ पुरुष आणि ३ महिला यांचा समावेश असून त्यांना नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित सहा जणांची प्रकृती स्थिर आहे.  कोसळलेल्या घराचा ढिगारा उपसण्याचे काम सकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हि दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत.घर कोसळताच मोठा आवाज झाला. त्याबरोबर आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी पोहचले.  तोपर्यंत घराची मोठी पडझड झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले आणि शक्य होईल तेवढ्या जखमींना नजीकच्या डॉ. आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर घर दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचवकार्य सुरू करीत काही जखमींना ढिगाऱ्यामधून बाहेर काढले.

मृतांची नावे

१ . साहिल सर्फराज सय्यद (मुलगा/ ९)
२.आरिफा शेख ( मुलगी/८)
३.जोहन इरराना (मुलगा / १३)
४. ४० वर्षीय व्यक्ती ( नाव माहीत नाही)
५. १५ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)
६. ८ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
७. ३ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
८. ५ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
९. ३० वर्षीय महिला ( नाव माहीत नाही)
१०.५० वर्षीय महिला (नाव माहीत नाही)
११. ८ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)

जखमी

१. मरीकुमारी हिरांगणा ( महिला ३० गंभीर)
२.धनलक्ष्मी ( महिला / ५६)
३.सलीम शेख (पुरुष / ४९)
४.रिझवाना सय्यद (महिला /३५)
५.सुर्यमणी यादव ( पुरुष / ३९)
६. करीम खान ( पुरुष /३०)
७. गुलजार अहमद अन्सारी ( पुरुष / २६)

 331 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.