ठाणे – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील यांच्या हस्ते अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंगगड ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्गत सेस फंडातून ( स्व उत्पन्न निधी) शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे पुरवठा केला जात आहे. यावेळी शेतकऱ्यांना प्रामुख्याने कर्जत ३, कर्जत ७, एम.टी. यू १०१०, सी.ओ.५१ या वांनांचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडे एकूण 1 हजार 340 क्विंटल भातबियाण्याची मागणी करण्यात आली होती, त्याप्रमाणे आज अखेर जिल्हामध्ये 1 हजार 111 क्विंटल बियाणे प्राप्त झाले असून पंचायत समितीस्तरावर बियाण्यांचे वाटप सुरू असल्याचे कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे यांनी सांगितले.
यावेळी अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निर्गुडा, उप सभापती बाळाराम कांबरी, जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील , सरपंच तुषार पाटील, उपसरपंच प्रशांत ठाकूर, तसेच अंबरनाथ पंचायत समिती गट विकास अधिकारी शीतल कदम, कृषि अधिकारी प्रज्ञा गवई उपस्थित होत्या.
531 total views, 1 views today