पहिल्याच पावसाने दिला दणका

इमारतीच्या संरक्षण भिंत कोसळल्या, जनजीवन विस्कळीत 

ठाण्यात अनेक भागांमध्ये पाणी साचलं

ठाणे – मुंबईसह ठाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार  पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाचा कहर केला आहे. मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अगदी तशीच अवस्था ठाण्यातही बघायला मिळते. ठाण्यात अनेक भागांमध्ये पाणी साचलं. एका सोसायटीत तर संरक्षण भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. पावसामुळे लोकल ट्रेन सेवादेखील अनेक तास ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं 

रेल्वे वाहतूक ठप्प

मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलेला आहे. माटुंगा-सायन-कुर्ला या दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने, रेल्वे वाहतूक सकाळी दहा वाजल्यापासून जवळपास पाच तास ठप्प होती. रेल्वे वाहतूक ठाणे ते सीएसटी दरम्यान ठप्प झालेली होती. त्याचबरोबर पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना देखील त्याचा फटका बसला. रेल्वे स्टेशनला आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी परतले. सुदैवाने ठाणे ते कर्जत कसारा दरम्यान लोकल लोकल सुरू होती. पहिल्याच पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाल्याने रेल्वे प्रशासनावर नागरिकांनी खापर फोडले 

वंदना एसटी डेपोत गुडघाभर पाणी

मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक सखल भागात पाणी साचले. ठाण्यातील वंदना एसटी डेपो याठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुकानदारांना देखील याचा फटका बसला आहे. त्याचबरोबर वाहनांना देखील मोठा फटका बसला आहे

ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी

मुसळधार पावसामुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ठाणेकरांना पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत आहे. तसेच दुचाकी गाड्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. वाहनधारक अक्षरशः दुचाकी पाण्यातून ढकलत आपली वाट काढत आहे. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाई काम सुरू असल्याचे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले. मात्र कुठेही पूर्णपणे नालेसफाई न झाल्यामुळे नाले, गटार तुडूंब भरून वाहत आहेत. त्याचा फटका दुकानदारांना देखील बसला आहे.

सोसयटीतील इमारतीची भिंत कोसळली

ठाण्यातील मनोरमानगर येथील सुकुर गार्डन स्वामी समर्थ पेज वन या इमारतीची सुरक्षा भिंत पडल्याने तीन ते चार गाड्यांचा नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण भिंतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं.

 430 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.