उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला 

उल्हासनगर – उल्हास नगर येथील मोहिनी पॅलेस इमारतीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा  पुन्हा एकदा उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली.या मध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. 

उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसंच अशा धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याचा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहे. परंतु या घटनामुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादयक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   

या इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट होते. स्लॅब कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे काही रहिवाशांनी बाहेर पळ काढला तर काहींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. या पथकांनी ढिगारा बाजूला करुन सात मृतदेह बाहेर काढले.  

गेल्याच आठवड्यात मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यात देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. १९९४ – ९५ मध्ये बांधलेल्या काही धोकादायक इमारतीमधील स्लॅब पालिकेने कारवाई करत तोडले होते. मात्र संबंधित बिल्डरने हेच स्लॅब वेल्डिंग करत पुन्हा  जोडले त्यामुळे या दुर्घटना होत आहेत. त्यामुळे अशा इमारती शोधून त्या रिकाम्या कराव्यात तसेच अशा इमारती बांधणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.  

दुर्घटनेतील मृतांची नावं

1) पुनीत बजोमल चांदवाणी (वय 17 वर्ष) 2 ) दिनेश बजोमल चांदवाणी (वय 40 वर्ष) 3 ) दीपक बजोमल चांदवाणी (वय 42 वर्ष) 4 ) मोहिनी बजोमल चांदवाणी (वय 65 वर्ष) 5 ) कृष्णा इनूचंद बजाज (वय 24 वर्ष) 6 ) अमृता इनूचंद बजाज (वय 54 वर्ष) 7 ) लवली बजाज (वय 20 वर्ष)  

 473 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.