ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष, विधी विभागाचे स्वप्नील महिंद्रकर आणि pawas या संस्थेद्वारे ठाण्यातील भटक्या कुत्रांचे रेबीस लसीकरण मोहीम सुरु केली आहे. कोरोना काळात पालिकेवर कामाच्या तणावामुळे भटक्या कुत्रांचे लसीकरण झाले नाही. त्यामुळे आता या कुत्र्यांचे लसीकरण मनसे आणि pawas या संस्थेच्या पुढाकाराने होत आहे. वसंत विहार येथे हा उपक्रम चालू असून शनिवारी २५० कुत्र्यांचे लसीकरण झाले.आणि रविवारी पुन्हा लसीकरण मोहीम होणार असून २५० ते ५०० कुत्रांना लसीकरण करण्याचा मानस असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले.
643 total views, 1 views today