म्यूकरमायकोसिस, पोस्ट कोविड शासनमान्य आजारात समाविष्ट करा

भाजप शिक्षक आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे  – राज्यात आता कोरोना सोबतच म्युकरमायकोसिस व पोस्ट कोविड च्या आजारांनी देखील थैमान माजविला आहे. त्यामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जीव जात असून अश्या जीवघेण्या आजारांच्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडत असल्याने या गंभीर आजारांचा समावेश शासनमान्य आजारात करून  शिक्षक ,शिक्षकेत्तर व इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्याकरिता भाजप शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजिका डॉ कल्पना पांडे व सहसंयोजक विकास पाटील  यांनी मा मुख्यमंत्री , मा शिक्षणमंत्री, मा सार्वजनिक आरोग्य मंत्री व अपर सचिव सार्वजनिक आरोग्य विभागाला निवेदन पाठविले आले आहे.
राज्यात कोरोनामुळे अनेक आरोग्य सेवक , पोलीस , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा  व त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला तसेच अनेकांनी या रोगावर मात देखील केली परंतु या रोगाचा रुग्णालयाचा खर्च खूपच जास्त असल्यामुळे खर्चाच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता शासनाने कोविड-१९ आजाराचा समावेश १७ डिसेंबर २०२० च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयामुळे शासनमान्य आकस्मिक आजारात  करण्यात आला होता  तसेच ३० एप्रिल २०२१ च्या शुद्धीपत्रकाने कोविड-१९ आजार २१ मे २०२० पासून समाविष्ट करण्यात आला परंतु आता कोविड -१९ या  आजारामुळे म्युकरमायकोसिस, पांढरी बुरशी, काळी बुरशी, कावासाकी असे अनेक पोस्ट कोविेडचे गंभीर आजार उद्भवण्याचे प्रमाण आता राज्यात वाढले आहे .या आजाराचे प्रमाण पुणे , मुंबई , नागपूर , अमरावती , अकोला , चंद्रपूर , गोंदिया , कोल्हापूर औरंगाबाद , ठाणे , नाशिक तसेच हळूहळू संपूर्ण राज्यात वाढत असून अनेक कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव व जीव देखील गमावला आहे . या आजारांवर होणारा वैद्यकिय  खर्च ५ ते १० लाखांच्या घरात असल्यामुळे सर्वसामान्य शिक्षक, शिक्षकेत्तर व इतर राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना बिलकुल परवडणारा नाही त्यामुळे या आजारावरील खर्चासाठी कर्मचाऱ्यांना मोठ्याप्रमाणात कर्ज काढावे लागत असून स्वतः जवळची जमापुंजी देखील खर्ची घालावी लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे ,असे कोकण विभाग संयोजक श्री एन..एम।भामरे यांनी सांगितले त्यामुळे अशा घातक, गंभीर व जिवघेण्या आजारांची वैद्यकीय प्रतिपूर्ती होणे क्रमप्राप्त आहे , त्यामुळे म्युकरमायकोसिस व पोस्ट कोविडच्या सर्व आजारांचा समावेश शासनमान्य आकस्मिक आजारात करुन तात्काळ सुधारित शासननिर्णय निर्गमित करावा अशी  मागणी डॉ कल्पना पांडे ,  विकास पाटील,श्री एन.एम.भामरे,  किशोर पाटील,  विनोद भानूशाली,  विनोद शेलकर, संदिप कालेकर,सिंधू शर्मा, , जि.ओ.माळी, प्रकाश सोनार, किसन पाटील, आनंद शेलार,चंद्रकांत खुटाळे, भगवान परब, दिलीप चव्हाण, वसंत सावंत,  सोमनाथ सुरवसे, हेमंत कोकाटे यांनी केली आहे.

 256 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.