सर्व बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित आहेत असे शपथपत्र आयुक्तांनी द्यावे

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर परीक्षेत्रात भाजपा आणि शिवसेना यांच्यात जंगी सामना कचऱ्याच्या प्रश्नावरून होत आहे. भाजपाने आयुक्तांनी ओला-सुका कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एक वेगळा कर लादला असून नागरिकांना वेठीस धरल्याची भूमिका भाजपाने घेऊन त्यावरून बॅनरच्या माध्यमातून रान उठवले आहे. तर शिवसेनेचे पदाधिकारी आयुक्तांची भूमिका योग्य असल्याचा शेरा देत आहेत. यामुळे तत्कालीन महासभेत कचऱ्याच्या कराचा प्रश्न सर्वपक्षीय नागरसेवकांनी स्थगीत ठेवला होता मग आता प्रशासनाने तो कसा काय कार्यान्वित केला असा प्रतिप्रश्न सेना पदाधिकाऱ्यांना केला. जर सर्व बायोगॅस प्रकल्प पुर्णपणे कार्यान्वित असतील तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शपथपत्र द्यावे अशी मागणी केली.

भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी डोंबिबली विभागीय कार्यालयातील पत्रकारकक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे मारताना अनेक विषयाच्या त्रुटी मांडल्या. त्यांनी सांगितले जर नगरविकासकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना अशा प्रकारच्या कराला मान्यता दिली आहे का ? का आयुक्त आपली मनमानी करून कोविड काळात गांजलेल्या नागरिकांवर या कराच्या माध्यमातून त्यांचे जगणे मुश्किल करीत आहेत याचे उत्तर जो कोणी आयुक्तांची पाठराखण करीत आहेत त्यांनी द्यावे. डोंबिवलीतील सुतीकागृहाचा प्रश्न आजही तसाच पडून आहे यासाठी निधी आणला पण त्याचा विनियोग आयुक्तांना करता आला नाही. महानगरपालिकेच्या निर्मिती पासून २१ स्पेशलायझेशन डॉक्टर्स असावेत ,अशी अस्थापना सूची शासनाने मंजुर केली होती.परंतु त्यावेळेस अशा डॉ क्टर्स ची भरती केली गेली नाही. त्यानंतर पुन्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ८३ डॉक्टर्स ची  ४ जून २०१५रोजी अस्थापना सुची मंजुर केली .परंतु तेव्हा सुध्दा स्पेशलायझेशन डॉक्टर्स ची नियुक्ती करण्यात आली नाही.शास्त्री नगर रुग्णालयात शवविच्छेदन विभाग सुरु होण्यापूर्वी स्पेशलायझेशन डॉ क्टर्स ची नियुक्ती करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत आ. रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांना केली.

 375 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.