टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात मुंबईत एफ.आय.आर. दाखल


मुंबई – काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे समाजमाध्यमांवर जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल. मुंबई 

जवळपास पंधरा दिवसानंतर, तारक मेहता का उलटा चष्मा या सिरीयल मध्ये बबिता जी ची भूमिका साकारणारी, टी.व्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० मे २०२१ रोजी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम वरून आपल्या वेरीफायड असलेल्या @mmoonstar या हँडल वरून एक जातीवाचक विडीयो पोस्ट शेयर केली. या विडीयो मध्ये  दत्ता यांनी आपण युट्युब वर पदार्पण करणार असून त्यासाठी चांगला मेकअप करीत आहोत कारण आपल्याला सुंदर दिसायचे आहे आणि “भंगी” सारखे नाही असे वक्तव्य केले होते. मुलुंड मधील काँग्रेस कार्यकर्ते आणि वाल्मिकी विकास संघाचे पदाधिकारी असलेले विनोद काजनिया यांनी १२ मे २०२१ रोजी गोरेगाव पोलीस ठाणे  येथे दत्ता यांच्या विरोधात तक्रार दाखल अर्ज दाखल केला होता. दत्ता आंबोली पोलीस ठाणेच्या हद्दीत वास्तव्यास असल्याने पोलिसांनी अर्जास आंबोली  पोलीस ठाणे येथे वर्ग केले. त्यानंतर वाल्मिकी विकास संघचे पदाधिकारी रेशमपाल बोहित यांची जबानी घेऊन, २६ मे २०२१ रोजी,  पोलिसांनी दत्ता यांच्या विरोधात प्रिवेन्शन ऑफ अॅट्रोसीटीस अॅक्ट २०१५ अंतर्गत भा. दी.वि. सह कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इतर राज्यांमध्ये दत्ता विरोधात याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असले तरी महाराष्ट्रात आणि मुंबईत हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार झाली असल्याने आता दत्ता यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

“टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये वाल्मिकी समाजाचे कित्येक नामांकित कलाकार आहेत आणि सर्व देखणे आहेत. त्यामुळे मूनमून दत्ता यांनी सरसकट एका जातीविशेष समुदायाचे लोकं यांस विद्रूप दिसतात असे संबोधन करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. दत्ता यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि जातीवाचक असून तिच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. यामुळे इतर सेलिब्रिटी, फिल्म आणि टीवी स्टार्स यांसह सामान्य नागरिकांना देखील अनुसूचित जाती जमातीतील लोकांचा जातीवाचक उल्लेख करून त्यांना अपमानित करण्यापासून काय होऊ शकते याबाबत एक आदर्श  उदाहरण  निर्माण होईल”, अशी भावना यावेळी मुंबई कॉंग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे यांनी व्यक्त केली.

 637 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.