कासारवडवली ते गायमुखमेट्रो लाईनच्या कामासाठी आज रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत रास्ता बंद  

ठाणे  – कासारवडवली ते ओवळा-गायमुख रस्त्यावर मेट्रो लाईनच्या पिलरच्या कामासाठी आज रात्री ११ ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद
कासारवडवली ते ओवळा-गायमुख रस्त्यावर मेट्रो लाईनच्या पिलरचं काम चालू असल्यामुळे आज रात्री ११ ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्यावर सध्या मेट्रो लाईनचं काम सुरू असून वेदांत हॉस्पिटल ते ओवळा या दरम्यान आज रात्री गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यातून घोडबंदरकडे जाणा-या सर्व वाहनांना कापुरबावडी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गाने माजिवडा, घोडबंदर दिशेने जाणा-या सर्व वाहनांना तत्वज्ञान विद्यापीठ येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या सर्व वाहनांना कापुरबावडी सर्कलवरून उजवे वळण घेऊन कशेळी, काल्हेर, अंजुरफाटा मार्गे किंवा माजीवडा उड्डाणपूलाखालून यु टर्न घेऊन खारेगाव ब्रीज मानकोली नाका मार्गे जाता येईल. मुंबईहून कापुरबावडी जंक्शन घोडबंदर रोडकडे जाणा-या जड-अवजड वाहनांना माजीवडा गोल्डन डाईज ब्रीजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खारीगाव टोलनाका मार्गे जातील.

 424 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.