वृक्ष प्राधिकरण सदस्यांचे नविन संकल्प ठाणे शहरात जैवविविधता लागवड !!
ठाणे – महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालय सूचित “माझी वसुंधरा” उपक्रमात ठाणे महानगरपालिकेची पहिल्या फेरीत निवड झाली आहे. त्यामुळे ठाण्यात अधिक ग्रीन स्पेस निर्माण होणार असून या बद्दल वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत तावडे, नम्रता भोंसले- जाधव शिवसेनेच्या नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी ठाणे शहरात वृक्षांची लागवड करण्यापासून ते वृक्ष संवर्धन करणे यासंदर्भात सखोल चर्चा आयुक्तांशी करण्यात आली.
तसेच गेल्या काही दिवसांमध्ये ताउक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्यात विशेषतः आपल्या ठाणे शहरात वादळामुळे झाडांचे, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात देखील आयुक्तांना माहिती देण्यात आली असून अशा परस्थितीमध्ये भविष्यात निगा व देखभालीची योग्य ती उपाययोजना सक्षमपणे करण्याचा प्रयत्न वृक्ष प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची ग्वाही आयुक्तानी दिली.
दरम्यान, येत्या ५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष प्राधिकरण विभागा मार्फत ठाणे शहरात अधिक वृक्ष लागवड उपक्रम कोविड-१९ संदर्भात शासनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आयोजित करण्यात यावे, जेणेकरून पर्यावरणाचे समतोल व शहराची जैवविविधता राखण्यास ही बाब अतिशय उपयुक्त ठरेल. तरी या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण नुसते वृक्ष लागवड नव्हे तर प्रत्येकानी एक झाड लावून त्याला आपले नाव द्यायचे आणि त्या वृक्षाला दत्तक घेऊन त्याची निगा व देखभाल स्वतः करायची असा “इच वन प्लांट वन” हा अनोखा उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी यावेळी वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत तावडे, नम्रता भोंसले- जाधव यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.
357 total views, 1 views today