आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल कराटे स्पर्धेत ठाण्याचा प्रचित शहा मानकरी

ठाणे – आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल कराटे स्पर्धा नुकतीच श्रीलंका येथे पार पडली या स्पर्धेत भारतातून २००० स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेतील १२ ते १३ वयोगटातील स्पर्धेत ठाण्यातील खारकर आळी परिसरातील प्रचित सुचित शाह याने प्रथम क्रमांक मिळवून “इडो-श्रीलंका व्हर्च्युअल काटा चॅम्पियनशिप २०२१ चा मानकरी ठरला.

प्रचित हा ठाण्यातील पोलिस पब्लिक स्कूल मध्ये शिकत असून फ्राझ शेख यांच्या मार्गदर्शना कराटेचे प्रशिक्षण सेन्ट जाॅन स्कूल येथे घेते आहे.त्याला ठाणे महापालिकेकडूनही सन्मानित करण्यात आले असून आतापर्यंत त्यानी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे,श्रीलंका,ब्राझील येथील स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्याच्या या यशाबद्दल या सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत असून या भागातील ठाणे जिल्हा इंटक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी त्याच्या घरि जाऊन सन्मानित केले व शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी ठाणे युवक काँग्रेस सरचिटणीस प्रवीण खैरालिया,सामाजिक कार्यकर्ते अंकुश  चिंडालिया आदि मान्यवर उपस्थित होते.

 467 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.