ठाणे – महावितरण कर्मचा:यांना फ्रन्ट लाईन वर्कर घोषीत करावे, त्यांना ५० लाखांच्या अनुदान द्यावे, लसीकरण करण्यात यावे, टीपीए स्कीम पुन्हा सुरु करावी, बील वसुलीची सक्ती त्यांच्यावर करु नये अशा विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या या मागण्या मान्य न झाल्यास कॉंग्रेस आम्ही वेळ पडल्यास ८० हजार कामगारांसाठी आंदोलन उभे करु आणि यापुढेही जाऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वेळ पडल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची देखील आमची तयारी असल्याचे मत ठाणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
महावितरणच्या विविध वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्यी वतीने आज शहर कॉंग्रेसच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, आदींसह वीज वितरणचे कर्मचारी देखील हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून काम करीत आहेत. परंतु अद्यापही त्यांना फ्रन्ट लाईनचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना हा दर्जा मिळावा यासाठी महावितरणच्या विविध संघटना प्रयत्न करीत आहेत. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता ठाणे शहर कॉंग्रेसने देखील या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लढय़ात रस्त्यावर उतरविण्याची तयारी केली आहे. वीज कामगार अभियंते व अधिकारी तसेच कंत्रटी कामगार यांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्यावा, तसेच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, कोवीडमुळे मृत्यु पावलेल्या वीज वितरण कर्मचा:यांना महाराष्ट्र शासनाने प्रमाणो ५० लाखांचे अनुदान द्यावे, तीनही कंपन्यासाठी एम.डी.इंडिया या जुन्याच टीपीए कंपनीची पुन्हा नेमणुक करावी, कोरोनाचा वाढता प्रादरुभाव पाहता वीज वितरण कर्मचाऱ्यांना वीज वसुलीची सक्ती करु नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या पत्रकार परिषदेला लिलेश्वर बनसोड (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन – आयटक, संयुक्त सचिव), रमेश नाईक (महाराष्ट्र वीज कामगार महासंघ – बिएमएस – अध्यक्ष, भांडुप परिमंडळ), संदीप वंजारी – महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस इंटक आदींसह इतर वीज वितरण संघटनांचे पदाधिकारी तसेच कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महावितरणच्या या ८० हजार कामगारांना कॉंग्रेसचा पाठींबा असणार आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीवर दबाव आणू वेळ प्रसंगी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करुन यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. परंतु यापुढेही जाऊन या कामगारांसाठी वेळ पडल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठीही आम्ही मागणी करु .
(विक्रांत चव्हाण – शहर अध्यक्ष कॉंग्रेस, ठाणे शहर)
आम्ही सुदरुढ जगण्याचा हक्का मागत आहोत, प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे काम करीत आहोत, लसीकरण व्हावे अशी मागणी आहे. परंतु आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे आमचा धीर सुटत आहे. त्यामुळे आम्हाला फ्रन्टलाइन वर्कर घोषीत करावे, टीपीए जुन्याच कंपनीच्या माध्यमातून करण्यात यावे. त्यामुळे शासनाला हा पहिला इशारा या माध्यमातून देत आहोत. परंतु यापुढे आमचा धीर सुटला आणि आम्ही पुढील पाऊल उचलले तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहिल.
(डॉ. संदीप वंजारी – महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस इंटक – कार्याध्यक्ष)
504 total views, 1 views today