चक्री वादळात नुकसान झालेल्या आदिवासींना एम स्पोर्टस् फाऊंडेशनकडून मदतीचा हात

ठाणे – नुकत्याच  झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका अनेक आदिवासी गावांना देखील बसला, त्यात अनेक घरांचे नुकसान झाले. अशा गावात जाऊन नुकसान झालेल्या आदिवासी बांधवाना एम स्पोर्टस् फाऊंडेशनकडून मदतीचा हात लाभला आहे. अनेक गावातील घरांचे छप्पर या वादळात उडून गेली आहेत हे छप्पर बसविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. अशी माहिती एम स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिली.    

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट देशभर पसरलेले आहे. या महामारीच्या काळात गरजू लोकांकरिता हि संस्था आशेचा किरण ठरली आहे. क्रिडा क्षेत्राशी निगडित असलेले प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले, त्याबरोबरच संकटकालीन गरजू लोकांच्या मदतीला धाऊन जाऊन त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपण सामाजिक बांधिलकी कशी जपायला हवी याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एम स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी हे आहेत      
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या अनेक आदिवासी पाड्यांवर प्रत्यक्ष जाऊन आणि पाहणी करून या बांधवांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. ठाणे जिह्यातील अनेक तालुक्यांत जाऊन ते मदतकार्य करत आहेत. गेल्या वर्षभरात १५०० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप केले. तेवढ्यावर न थंबता या संस्थेने कम्युनिटी किचन सुरू केले असून किचनच्या माध्यमातून सतत ४० दिवस ७०० ते ८०० लोकांना एकवेळचे जेवण पुरवण्यात आले. लॉकडाऊन काळात कामधंदे बंद असल्याने बरेचसे मजदूर आपल्या गावी चालत गेले. अशा लोकांसाठी ठिकठिकाणी ताक, पाणी बॉटल आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संस्थेकडून  टोपी वाटप करण्यात आले.
पोलिस दिवसरात्र जनतेसाठी कार्यरत असतात. त्यांच्यासाठी झोन ५ मधील ८ पोलिस स्थानकात पोलिसांना १० हजार पाणी बॉटल्सचे वाटप संस्थेतर्फे करण्यात आले. त्याप्रमाणे दर दिवसाआड आदिवासी पाड्यात जाऊन जवळपास ५० कुटुंबांना किराणा वाटप देखील करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश होते, परंतु छोट्या छोट्या आदिवासी गावात या ऑनलाईन शिक्षणाचा फटका बसला कारण मुलांकडे मोबाईल किंवा टॅब नव्हते. या समस्येवर मात करता यावी म्हणून संस्थेने शहापूर तालुक्यातील 3 आदिवासी शाळांना ५५ टॅब दिले. तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक शाळांना / मुलांना जवळपास ८००० वह्यांचे वाटप केले.
गरजू लोकांच्या मदतीला जाऊन एम स्पोर्ट्स फाऊंडेशने  समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.    

 454 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.