अमित ठाकरे यांच्या जनदिनानिमित्त कोरोना योध्यांना गोडाचं जेवणं

ठाणे – कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आता दुसऱ्या लाटेतही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या स्मशानभुमीतील कर्मचाऱ्यांसह लसीकरण केंद्रावर महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या  कर्मचाऱ्यांना मनसेचे ओवळा माजिवडा विधानसभा उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांच्या वतीने तब्बल १ हजार कोरोना योध्यांना सोमवारी डाळ, भात, खीरीचे जेवण  देऊन त्यांचा सन्मान केला.

मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आता दुसऱ्या लाटेतही स्मशानभुमीतील खास करुन जवाहरबाग स्मशानभूमी, कामगार स्मशानभुमी, माजिवडा स्मशानभुमीतील कर्मचाऱ्यांना जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच ओवळा विधानसभा मतदार संघातील सर्वच लसीकरण केंद्रावर काम करणारा स्टॉफ यांच्यासाठी देखील जेवण देण्यात आल्याची माहिती विचारे यांनी दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटांपासून हे सर्वच योद्धे जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करीत आहेत.  ते आपल्यासाठीच हे काम करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने प्रत्येक केंद्रावरील स्टॉफ प्रत्येक नागरीकाला लस देण्यासाठी धडपडत आहे. केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरीकाशी आपलुकीने बोलून त्यांना धीर देण्याचे कामही हे कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कुठेतरी आभार मानता यावेत याच उद्देशाने आज अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेवणाचे वाटप करण्यात आल्याची माहिती पुष्कराज विचारे यांनी दिली.
याशिवाय जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील मठातही या निमित्ताने गोर गरीब गरजू लोकांना जेवणाचे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी सोशल डिस्टेसींगचे कुठेही नियम न तोडता अगदी शिस्तबध्द पध्दतीने हे कार्य करण्यात आले. यावेळी तब्बल १ हजार कोरोना योध्यांना जेवण देण्यात आले.

 409 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.