म्युकरमायकोसिस आजारावर उपचार मोफत करावा- खासदार राजन विचारे यांनी नवीमुंबई आयुक्त अभिजीत बांगर त्यांच्या केली मागणी
नवी मुंबई -देशात व राज्यात कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेले असताना राज्य शासनने व प्रशासणाने योग्य रीतीने घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थिती नियंत्रणात आणू शकलो परंतु कोरोना महामारीची तिसरी लाट सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये येण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे यासाठी आपण सतर्क राहणे हे तितकेच गरजेचे आहे यासाठी आज खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिलेल्या पत्रांचा लेखाजोखा घेण्यासाठी उपस्थित राहिले होते खासदार राजन विचारे यांच्या वतीने म्युकरमायकोसिस या नवीन आजारासाठी वाशी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारून तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करावी तसेच या रुग्णांना मोफत उपचार करावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती त्यावर आयुक्तांनी याचेही काम प्रगतीपथावर सुरू आहेत अशी माहिती त्यावेळी दिली .खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात महानगरपालिकेने चार हजार बेड उपलब्ध केलेले आहेत यांना दिवसाला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन लागत असतो यासाठी महापालिका ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करीत आहे परंतु महापालिकेकडे स्वतःची अशी कोणतेही ऑक्सीजन प्लांट नसल्याने ठाणे व मीरा भाईंदर महापालिकेने जसे ऑक्सीजन प्लांट उभे केले आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा ऑक्सीजन प्लांट उभे करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती माहिती घेतली असता याचेही काम प्रगतीपथावर सुरू आहेतयेत्या ३-४ दिवसात यांचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती आयुक्तांकडून देण्यात आली तसेच आज खासदार राजन विचारे यांनी पत्राद्वारे मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या १११ वॉर्डातील खाजगी शाळा ,आरोग्य केंद्र, समाज मंदिर नागरिकांना सोयीचे होणार आहे ठिकाण ओळखून त्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे तसेच प्रत्येक लसीकरणाच्या केंद्राची वेळ व ठिकाण याची जाहिरात फलक उभे करून पुरेपूर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून नागरिकांना सोयीचे पडेल तसेच लसीकरणाचा पुरवठा पुरेसा उपलब्ध झाल्यात मोठ्या गृह संकुलामध्ये सुद्धा लसीकरण सुरू करावे अशी मागणी या वेळी करण्यात आली.
तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई ,झाडे छाटणी ,रस्ते डांबरीकरण यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी तसेच धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत त्यांचे सर्वेक्षण करून ५०० नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे घरे उपलब्ध करून ठेवावी
नुकताच चक्रीवादळामुळे पाम बीच मार्गावर सानपाडा मोराज सर्कल जवळ विशाल नारळकर या तरुणाचा विद्युत पोल अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व नोकरी मिळवून द्यावी अशी मागणी खासदारांनी आयुक्तांकडे केली त्यावर आयुक्तांनी त्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत राज्य शासनाकडून मिळाली आहे असे सांगण्यात आले होते .या पुढेही मदत करण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले
554 total views, 1 views today