ठाणे – ठाण्यात ट्राफिक वॉर्डन म्हणून काम करणाऱ्यांना आमदार संजय केळकर व समतोल सेवा फाउंडेशन मार्फत मोफत अन्नधान्याचे किट देण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील होते.
ट्राफिक वॉर्डन म्हणून काम करणारे हे कर्मचाचरी गेली दहा महिने पगाराविना काम करत आहे. या कामगारांना तातडीने पगार मिळावा यासाठी आमदार केळकरांनी पालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे व टक्केवारी मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली आहे. या बाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला असून ऊन, पावसातून ट्राफिक वॉर्डन हे आपले कर्त्यव्य बजावत असून त्यांना पगार काढण्यासाठी ४% ची मागणी करावी हे अत्यंत निंदनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. केळकर यांच्यामुळे लवकरच या कामगारांना पगार मिळणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या टक्केवारी मध्ये पगार अडकल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून या टक्केवारी संदर्भात ठा म पा आयुक्तांना १८ वॉर्डन च्या सहीनिशी आम्ही तक्रारी पत्र दिले आहे असे ट्राफिक वॉर्डन यांनी बोलताना सांगितले.
517 total views, 2 views today