कोरोना काळात व्हिडीओकॉलद्वारे कैद्यांचा नातेवाईकांशी नातेवाईकांशी संवाद

ठाणे कारागृहात दररोज दोनशे जण घेतात  लाभ

ठाणे – कैद्यांमध्ये कोरोनाचा फेलाव होऊ नये याकरिता त्यांच्या नातेवाईकांशी घेतल्या जाणाऱ्या भेटीवर लॉकडाउनच्या  काळात ठाणे कारागृहात  बंदी घालण्यात आली आहे .त्यातच कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोस्ट सेवाही बंद होती . परिणामी येथील या येथील कैद्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकत नव्हता.  त्यांना कुटुंबाची ख्याली खुशाली समजत नव्हती . यावर उपाय म्हणून तुरुंग प्रशासनाने कैद्यांकरता व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली . त्यामाध्यमातून आठवड्यातून दोनवेळा कैद्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधता येतो .अशाप्रकारे रोज दोनशे कैदी ठाणे कारागृहातुन त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधत आहेत .

कारागृह म्हटलं की बंदिस्त जग. बाहेरच्या कोणत्याही बाबींशी या आतल्या जगाचा संपर्क राहत नाही. कारागृहात येतात ते शिक्षा भोगायला. अनेक जण भयंकर अशा गुन्ह्यांमधले आरोपी असतात . आणि जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहाच्या बंदिस्त वातावरणात रहाणं अनिवार्य असत. माणूस जन्मत: गुन्हेगार नसतो असं म्हणतात , परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते. पण मग योग्य आणि पोषक परिस्थिती मिळाली तर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो आणि अंगुलीमालासारखा कुख्यात गुन्हेगार सुद्धा सरळमार्गी होऊ शकतो या कथा आपण वाचल्या आहेत.
हाच माणुसकीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन ठाणे  कारागृहाच्या अभिनव कल्पनेने व्हिडीओकॉल द्वारे कैद्याने संभाषण आप्तेष्ठांशी करण्याचे ठरवले. मागील वर्षभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फेलाव होत आहे . त्याने अनेकांचे मृत्यूही झाले . कोरोना महामारीचा सगळेच जण आपल्या परीने मुकाबला करीत आहेत . याचाच भाग म्हणून पहिल्या लॉकडाऊन पासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम बनविण्यात आले होते . याचाभाग म्हणून कैद्यांची त्यांच्या नातेवाईकांबरोबर होणारी नियमित भेटी वर बंदी घालण्यात आली होती .त्यातच पोस्ट सेवाही बंद असल्याने या संकटाच्या काळात कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चिंतेने सतावले होते . यामुळे ते मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता होती . हा धोका ओळखून या कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधता यावा . त्यांची ख्याली खुशाली समजावी याकरिता व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली होती . 
 ठाणे कारागृहात १० स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्यात आले होते . या फोनवरून प्रत्येक कैद्याला आठवड्यातून दोनवेळा त्याच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर व्हिडीओ  कॉल द्वारे संपर्क साधता येतो .यात त्याला दहा मिनिटे बोलण्याची मुभा असून तो काय बोलतो यावर तुरुंगातील कर्मचारी लक्ष ठेवून असतात . याकरिता तुरुंगातील वीस  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . या क्रमांकावरून केवळ आऊटगोव्हिंग व्हिडीओ कॉलची अनुमती आहे .या सुविधेचा दिवसाला सुमारे दोनशे कैदी फायदा घेत आहेत . आता सुरु असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हि या सुविधेचा कैद्यांना फायदा होत आहे .तसेच ज्या कैद्यांच्या नातेवाईकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत त्यांना दूरध्वध्वनीद्वारे संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . याबाबत  ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून कैद्यांच्या नातेवाईकांच्या भेटी रद्द करण्यात आल्या आहेत . त्यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधता यावा म्हणून हि सुविधा उपलब्ध करून देण्यात  आली . त्याचा कैदी लाभ हि घेत असल्याचं अहिरराव यांनी सांगितलं .

ठाणे कारागृहात सध्याच्या घडीला ३ हजार ७०० कैदी आहेत . सुरक्षेचा उपाय म्हणून यातील ८०० कैद्यांना एप्रिल २०२० पासून आतापर्यंत पेरॉलवर सोडण्यात आले आहेत.  

 309 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.