ठाणे – मनपा प्रभाग क्रमांक ११ मध्ये नाले साफसफाई, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण कामांचा शुभारंभ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक कृष्णा पाटील, नगरसेविका नंदा पाटील, उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त पाटोळे, कांबळे व सावंत तसेच स्वच्छता निरीक्षक तन्मडवाड, दगडे आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकारिणी सदस्य कांचन पाटील, रुकसाना शेख, सुरेश पवार, यशवंत सावंत, नरपत दहिया, योगेश पाटील आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यात गोकुळनगर नाला, कॅसल मिल नाला, आनंद पार्क नाला तसेच श्रीराम वृंदावन येथील नाला यांची साफसफाई तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
467 total views, 1 views today