कोविड-१९ मुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या बालकांना तात्काळ मदतीसाठी गठीत

पालघर  – कोरोना संसगांमुळे दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी कृती दल (Task Force) ची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. चाईल्ड लाईन १०९८ ची माहिती फलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती अध्यक्ष, आयुक्त, महानगरपालिका, पोलीस आयुक्त अधिक्षक (ग्रामीण), सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष, जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बालगृहे करीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात यावे, येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी यावेळी दिल्या. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होतेवेळी आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा. ही माहिती रुग्णाकडून भरून घेण्याबाबत सर्व रूग्णालयांना निर्देश दिले. कोरोनामुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रन्स ७४०००१५५१८, ८३०८९९२२२२ अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पालघर ७०२०३२२४११, ९८२३५६१९५२ जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पालघर ९९२३३९७६२, ९८९०८५३२८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
चाईल्ड लाईन १०९८ व पोलीस संपर्क क्र १०३
८३०८९९२२२२ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००) 
७४०००१५५१८ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.