भाजपची ‘कोरोनामुक्त गाव’ मोहीम

लोकसहभागातून जिल्ह्यात पाच कोविड केअर सेंटर

ठाणे – ‘भाजप केवळ विरोधाला विरोध म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जनतेला सेवा सुविधाही देण्याचे काम करत आहे. जिल्ह्यात लोक सहभागातून पाच ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत’,अशी माहिती भाजपचे पालघर जिल्ह्याचे प्रभारी,आमदार संजय केळकर यांनी दिली

विक्रमगड येथे आज लोकसहभागातून उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘जनतेला कोरोना काळात, नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदत मिळावी, योग्य सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे. केवळ त्यांच्यावर टीका न करता भाजप प्रत्यक्ष जनसेवेतही उतरली आहे. कोरोनामुक्त गाव मोहीम हा त्या प्रयत्नांचाच भाग आहे’, असे केळकर म्हणाले.

विक्रमगड येथील कोविड केअर सेंटरसाठी मॅड या संस्थेने जागा दिली असून कर्मचारीही उपलब्ध करून दिले आहेत. ४० खाटांचे हे सेंटर असून चार डॉक्टर, कर्मचारी आणि विविध सोयी-सुविधांसह चार ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरही आहेत. पालघर जिल्ह्यात पाच ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून लवकरच मोखाडा आणि पालघर येथे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे केळकर यांनी सांगितले

यावेळी डॉ. हेमंत सवरा, बाबाजी काटोळे, प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच हरीश शाह आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.