त्यांनी होर्डिंग फाडले तर आम्ही प्लेकार्ड द्वारे सवाल करू

मुलुंड येथे भाजप कार्यकर्त्यांनी फाडून उतरवलेले मुंबई कॉंग्रेसचे होर्डिंग प्लेकार्ड स्वरूपात निर्माण करून मुलुंड  मधील मुंबई काँग्रेस कार्यकर्ते भाजप विरोधात आंदोलनास सज्ज.

मुलुंड – मोदी जी तुम्ही आमच्या मुलांचे वैक्सीन विदेशात का पाठवले असा प्रश्न करणारे मुंबई कॉंग्रेस द्वारे उभारण्यात आलेले होर्डिंग मुलुंड आणि घाटकोपर येथे भाजप कार्याकार्त्यानी फाडले आणि उतरवले. यांस प्रतिसाद म्हणून मुलुंड येथील मुंबई कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी होर्डिंग वरील मजकूर मोदींच्या छायाचित्रासह प्लेकार्ड स्वरूपात निर्माण करून मुलुंड येथील मुंबई काँग्रेस ब्लॉक कार्यालय परिसरात प्रदर्शित केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदर तोड़ फाड़ करण्याचे कृत्य थांबवले नाही तर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या परवानगीने, कोविड निर्बंधांचे पालन करत, प्रत्येकी पाच जणांचा ग्रुप बनवून प्रत्येक भाजप कार्यालयासमोर सदर प्लेकार्ड झळकावत मूक आंदोलन करण्याचा आमंचा मानस असल्याचे मनोगत या प्रसंगी मुंबई कॉंग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे यांनी व्यक्त केले.

मुंबई कॉंग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे यांच्यासह या प्रसंगी मुंबई कॉंग्रेसचे एस.सी, सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष सोनावणे, मुंबई काँग्रेस सोशल मिडियाचे कार्यकारी सदस्य धर्मेश सोनी, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज संसारे, आणि अनिल सिंग यावेळी उपस्थित होते.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.