ठाणे – महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध केली जाणारी माहिती सर्वसामान्यांपर्यंत सहजरित्या पोहोचविण्यासाठी शहरातील मुख्य भागातील जाहिरात फलकांचा वापर करण्याची गरज आहे. नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या डिजिटल बोर्डांचाही वापर केल्याने नागरिकांच्या सोयीचे होईल.
रोजच्या लसीकरण केंद्रांची माहिती , लस उपलब्ध असलेल्या खाजगी हॉस्पिटलची यादी , आपात्कालीन संपर्क क्रमांक , प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक , हॉस्पिटलनुसार उपलब्ध बेडची संख्या इ.माहिती नियमित प्रसिद्ध केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. अश्या सूचना मनसे कडून या निवेदनात करण्यात आल्या आहे. तसेच या निवेदनाचा विचार करण्यात येईल असे आश्वसन अति.आयुक्त देशमूख यांनी दिले. निवेदन देताना शहर अध्यक्ष रविंद्र मोरे ,सचिव नैनेश पाटणकर , रविंद्र सोनार , महिला शहर अध्यक्ष सौ.समीक्षा मार्कंडे ,रितूल टेलर , कुंदन ठाकूर उपस्थिती होती.
577 total views, 1 views today