ठाणे – ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रुग्ण संख्या कमी होऊन ८८७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ७ हजार ३१६ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ८ हजार ७६८ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात १६९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २७ हजार ४५५ झाली आहे. शहरात ९ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ८४६ झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत २१५ रुग्णांची वाढ झाली असून २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १३९ रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १७ रुग्ण सापडले असून एक मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत १२ बाधीत असून १ मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये १२७ रुग्ण आढळले ७ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २८ रुग्ण आढळले असून ३ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये ४४ रुग्णांची नोंद झाली असून एकही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये १३६ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३४ हजार २४९ झाली असून आतापर्यंत ८३१ मृत्यूंची नोंद आहे.
556 total views, 2 views today