शिवभोजन थाळीचा २१ दिवसात ११ हजारहून जास्त नागरिकांनी घेतला लाभ

डोंबिवली – कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य व गरजू लोकांना पोटभर जेवण मिळण्याच्या उद्देशाने मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मोफत शिवभोजन थाळी देण्याचे जाहीर केले होते. याच उद्देशाने व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश  मोरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून डोंबिवलीच्या मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने गरीब व गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप सुरु केले आहे. वाटप सुरु झाल्यापासून आतापर्यंत दररोज  ५०० असे २१ दिवसात ११ हजाराहून  अधिक गरजू नागरिकांनी  थाळीचा लाभ घेतात.शिवभोजन थाळी म्हणजेच नुसती चपाती भाजी नव्हे तर दररोज २ चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, वरण, भात, लोणचे ई. अन्नपदार्थांचा समावेश शिवभोजन थाळी मध्ये असून रोज नवीन नवीन पौष्टिक व सकस अशा भाज्यांचा समावेश केला जातो.शिवभोजन थाळी जेवण बनवण्यासाठी आई एकविरा व माउली महिला बचत गटांना याची जबाबदारी सोपविण्यात आली असून या बचत गटांमधील महिलांना रोजगाराची संधी देखील मिळाली आहे.राज्यभरात लॉकडाऊनची परिस्तिथी असल्यामुळे शिवभोजन थाळी हि पार्सल स्वरुपात नागरिकांना दिली जाते. या योजनेमुळे अनेक गरीब निराधार व गरजू लोकांना पोटभर व चांगल्या गुणवत्तेचे जेवण मिळत असल्याचे नागरिक स्वतःहून शहरशाखेस भेट देऊन सांगत असल्याचेहि पाहायला मिळत असल्यामुळे त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राजेश मोरे, शहर शाखेचे आभार मानले आहे.

 498 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.