डोंबिवलीतील विवेकानंद सोसायटीत कचरा व्यवस्थापन योजनेचा शुभारंभ उपायुक्त कोकरे यांच्या हस्ते उदघाटन

डोंबिवली – डोंबिवलीचा सांस्कृतिक ठेवा अशी ओळख असलेल्या विवेकानंद सोसायटीत  कचरा व्यवस्थापन योजनेचा  प्रारंभ झाला.या योजनेचे उदघाटन कल्याण डोंबिवली पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
सारस्वत काँलनी येथील माजी नगरसेविका खुशबू चौधरी , प्रमुख आरोग्य अधिकारी वसंत देगलूरकर, पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले ,  सोसायटीचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी , कर्मचारी , रहिवासी उपस्थित होते.
केंद्र शासनाने कचरा व्यवस्थापन बाबत निर्बंध घातले आहेत. त्यानुसार विविध संकुले, आस्थापना यांना कचरा व्यवस्थापन बाबत नियोजन करणे आवश्यक आहे.याचा विचार करुन विवेकानंद सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या माध्यमातून २०१८पासून या कचरा व्यवस्थापनाचा पालिकेकडे पाठपुरावा केला.खुशबू चौधरी यांनी यासाठी उपायुक्त कोकरे यांचे मार्गदर्शन घेतले. या  योजनेला आकार देण्यात चौधरी यांना यश आले.सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.पाच लाख खर्च करुन सोसायटीच्या वतीने श्रेडींग यंत्र खरेदी करण्यात आले. या मशीनच्या सहाय्याने विलगीकरणाने  आलेल्या ओला कच-या पासून सोसायटीच्या आवारात खत निर्मिती करण्यात येणार आहे.विवेकानंद सोसायटीत एकूण १७ इमारती  आणि ४१०सदनिका आहेत.दररोज ३००किलो ओला सुका कचरा निर्माण  होत असतो. त्यापैकी दिडशे ते दोनशे किलो ओला कच-याचे श्रेडिंग  करण्यात येईल.यामुळे कच-याचे खत होण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल.असे सोसायटीचे सचिव रमेश खुजे यांनी सांगितले.या प्रकल्प शुभारंभ प्रसंगी विवेकानंद सोसायटी चे अध्यक्ष रामचंद्र मारके, कमिटी सदस्य विजय पंडितराव, श्रीपती संत्री, विजय देसाई, भामरे, कमलापूरकर, गणेश पांढरतांबे , भाजपाचे पदाधिकारी प्रमोद भागवत, सुनील मिश्रा, विनय मणेरीकर, पालकर, राजेंद्र फडके, मोनाली उपस्थित होते.

प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून कचरा व्यवस्थापन सुरु करावे-  उपायुक्त रामदास कोकरेकचरा हि साधन नसून संपत्ती आहे.कचरा वाहून नेणारे ३४ डंपर आणि १० जेसीबी पालिकेने   बंद केले.त्यांच्या खर्चापायी पालिकेची अडीज कोटींची बचत झाली.गेल्या वर्षी तीन हजार मेट्रिक टनाची खत  विक्री पालिकेने केली.सध्या कचरा व्यवस्थापनतून पालिकेला मासिक एक लाख रु.मिळतात भविष्यात २५लाख मिळु शकतात. कच- याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास पालिकेस दहा कोटीची बचत होउ शकते.विवेकानंद सोसायटीप्रमाणे इतर सोसायटींनी अश्या प्रकारे मशीन बसवावे.ते शक्य नसल्यास प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून कचरा व्यवस्थापन सुरु करावे.असे उपायुक्त रामदास कोकर यांनी सांगितले.

 522 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.