डोंबिवली – अनधिकृत चाळी आणि डोंबिवली पश्चिम असे जणूकाही समीकरणच जुळलेले आहे.अनधिकृत इमारतींबरोबर अनधिकृत चाळी हे काही विकासकांनी ओळखले असून पालिका प्रशासनाने मात्र अनधिकृत इमारती व चाळींचे बांधकाम पूर्ण होईपर्यत फक्त तक्रारींची वाट पाहत असल्याचे आजवर दिसले आहे.कोविड काळात तर अनधिकृत चाळींच्या बांधकांमाना जोर आला आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त अनंत कदम यांचे मार्गदर्शनानुसार डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा या ठिकाणी चाळ बांधण्यासाठी तयार केलेले २० जोते तोडण्याची धडक कारवाई ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते आणि त्यांच्या कर्मचारी पथकाने केली. या सदर ठिकाणी बांधकाम होणार आहे हे कळल्यानंतर तात्काळ सदर कारवाई करण्यात आली. डोंबिवली पूर्व येथील बालाजी गार्डनच्या मागे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक करण्याची कारवाई ८ /ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी महापालिकाचे पोलीस व कर्मचारी यांच्या सहकार्याने व १ जेसीबीचा वापर करून केली.
445 total views, 1 views today