लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांचा सहभाग

मुंबई – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे  रविवार २३ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्स मधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.  

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग् तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.
 डॉ.सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

 हा कार्यक्रम २३ मे रोजी दुपारी १२ पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युट्यूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ  येथे थेट पाहता येणार आहे.
यापूर्वी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फॅमिली डॉक्टरर्सशी संवाद साधला होता. त्याच धर्तीवर उद्या राज्यातील बालरोग तज्ज्ञांसोबत संवाद साधणार आहेत.  

 321 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.