नोकरीच्छुक उमेदवार,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

 ठाणे  – नोकरीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा , सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम  योजनेअंर्तगत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे,केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, याकरीता उमेदवारांनी स्वत:ची माहिती अदयावत करणे आवश्यक आहे ,त्यामुळे आपणास रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळण्याची संधी मिळू शकते. आपण शैक्षणिक पात्रता, पत्ता,संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरूस्ती करणे, वेगवेगळया उद्योजकांनी वेळोवेळी  अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता आहे, आधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे, जुने कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे -400601 या कार्यालयाच्या वरील पत्यावर ई-मेल  asstdiremp.thane@ese.maharashtra.gov.in अथवा दुरध्वनी क्र. 022-25428300 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.

 345 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.