ठाणे – नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे कळवा येथील वीज पुरवठा करणारया वाहिन्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पावसाळा देखील आता सुरू होणार आहे.
त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सदर वीज वाहिन्या, फिडर यांची निगराणी व दुरूस्तीसाठी शनिवार २२ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कळवा खारेगाव, पारसिक नगर परिसरातील वीज पुरवठा खंडित राहणार असल्याचे टोरंट पॉवर कंपनीतर्फे सांगण्यात आले. या कामामुळे संघवी व्हॅली, ओझोन व्हॅली, वाधना कन्स्ट्रक्शन, अमृत आंगण, सूर्यदर्शन टॉवर, मैत्री वाटिका, सुभाष टॉवर, फिलीप्स गोडाऊन, नातू परांजपे रिअल्टर्स आदी भागातील वीज पुरवठा सकाळी ११ ते ४ वेळेत खंडीत राहणार आहे.
532 total views, 1 views today