‘द फेडरल ‘बँकेकडून लसीच्या साठ्यासाठी ४ शीतपेट्या भेट

ठाणे – ठाणे महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेकरिता लसीचा योग्य साठा करण्यासाठी ‘द फेडरल’ बँकेकडून ४ शीतपेट्या भेट देण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या ५५ केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीचे त्या-त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज करण्यात येत आहे. प्रशासनाला कोल्ड स्टोरेज करण्यासाठी हातभार लावावा तसेच पुरेशा प्रमाणात लसीची साठवणूक व्हावी या उद्देशाने ‘द फेडरल’ बँकेकडून ४ शीतपेट्या बँकेचे बिसनेस हेड सागर देशपांडे यांनी आरोग्य विभागाकडे सुपूर्त केल्या.

 321 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.