ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेवारस वाहनांचा लिलाव

ठाणे – ठाणे नगर वाहतुक उपशाखा येथील मोकळ्या जागेत, बेवारस मोटार सायकल अशी १७ वाहने ही बर्‍याच वर्षापासुन येथील मोकळया जागेतील आवारात ठेवण्यात होती. या वाहनांची तपासणी करून मालकांचा शोध घेण्यात आला. परंतु मूळ मालकाचा शोध न लागल्याने अखरे प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आला असून त्यानुसार या बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. 
  ही वाहने ही ऊन, वारा, पाऊस व दमट हवा या नैसर्गिक परिस्थितीमुळे गंजुन व सडुन पुर्णपणे वापरास अयोग्य झालेली आहेत.  बेवारस वाहनांचा  प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे यांनी मुल्यांकन करून दिलेल्या ९५००० रूपयात जाहिर लिलाव करून लिलावात येणारी रक्कम शासन भरणा करण्यात येणार असल्याची माहिती  शहर वाहतुक विभाग यांनी दिली.  सदर बेवारस वाहनांचा लिलाव  २७ मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता ठाणेनगर वाहतुक उप विभाग कार्यालयाचे मागिल बाजुस मोकळया जागेतील आवारात करण्यात येणार आहे. तरी सदर बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पुढे आले नाही तर सदर वाहनाचा लिलाव करण्यात येईल.

 529 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.