ठाण्यातील तरुणांचा प्रामाणिकपणा

वाहतूक पोलिसाचे पैशांनी भरलेले पाकीट केले परत

ठाणे : रस्त्यात सापडलेले एका वाहतूक पोलिसाचे पैशांनी भरलेले पाकीट ठाण्यातील तरूणांनी प्रामाणिकपणा दाखवत परत केल्याची घटना घडली. तरुणांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलीस असलेल्या उमेश खताते यांचे पैशांनी भरलेले पाकीट समतानगर येथे रोहित साळुंखे, हर्षद शिंदे, बंटी रहाटे, अंकित कंच्रला या तरूणांना सापडले. यामध्ये वीस हजार रुपये रोख, एटीएम कार्ड आणि खताते यांचे ओळखपत्र होते. तरुणांनी हे पाकीट खताते यांना परत करण्याकरिता समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक शहाजी खुस्पे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खताते यांना हे पाकीट सापडल्याचे सांगून समर्थ फाऊंडेशनच्या कार्यालयात बोलावून घेतले. या ठिकाणी चारही तरूणांच्या हस्ते व खुस्पे यांच्या उपस्थितीत हे पाकीट खताते यांना देण्यात आले. या तरूणांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक शहाजी खुस्पे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी सिद्धार्थ सोनवणे, चंद्रकांत डांगे आणि सुधीर गांधी आदी उपस्थित होते

 446 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.