ठाणे – गेल्या वर्षभरापासून अवघ्या देशात ‘कोव्हिड-१९’ या संसर्गजन्य महामारीमुळे एकप्रकारचे नैराश्य आलेय, आर्थिकदृष्ट्या अवघा समाज ठप्प झालाय. अशापरिस्थितीत लॉकडाऊनमुळे घरी बसून उदास झालेल्या लोकांना काहीसा विरंगुळा मिळावा, त्यांच्यात नवचैतन्य यावे आणि स्वतःत व कुटुंबात सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ऑनलाईन टॅलेंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये नृत्य, अभिनय, गायन, चित्रकला, घरगुती फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सेल्फी विथ फॅमिली आणि इतर कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ‘धर्मराज्य पक्षा’चे संघटक अजय जया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या टॅलेंट स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांनी आपल्यातील कलागुण ९६१९१११६४५ या व्हॅट्सऍप क्रमांकावर दि. २९ मे-२०२१ पर्यंत पाठवावेत, आम्ही त्यांना प्रसिद्धी तर देऊच, पण त्याचबरोबर दि. ३० मे-२०२१ रोजी नृत्यस्पर्धेचा निकाल फेसबुकवर ऑनलाईन जाहीर करुन, यशस्वी कलाकारांना पारितोषिकही देऊ, असे स्पष्ट करुन, आपल्यातील सुप्त कलागुण दाखवायची आणि लॉकडाऊनच्या काळात आनंदी राहण्याची ही संधी अजिबात न दवडण्याचे आवाहनदेखील अजय जया यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या शेवटी केल
527 total views, 1 views today