बारामती ॲग्रो कंपनीकडून ठाणे महापालिकेला ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

ठाणे – सामाजिक बांधिलकीतून बारामती ॲग्रो आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागास ८ अद्ययावत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट म्हणून देण्यात आले आहेत. आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख यांच्याकडे ते सुपूर्त केले.
यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, विश्वनाथ केळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवगीकर, डॉ. खुशबू टावरी तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सद्यपरिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या व निर्माण होणारा ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन आमदार रोहित पवार व बारामती ॲग्रोने सामाजिक बांधिलकीतून ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास दिले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपक्रम हे उपकरण प्रभावी ठरते. यामध्ये इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जात असून याचा कोरोना रुग्णांना चांगलाच लाभ होणार आहे. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात ते  ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असून तेथील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

 463 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.