डोंबिवली – ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कल्याण शहर, स्व.अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती आणि हेल्पिंग हॅण्ड्स’ यांच्या वतीने, कल्याण येथील ओक हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणानंतर उद्भवणारा रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन केडीएमसी आरोग्य अधिकारी डॉ.संदीप निंबाळकर,अभाविप पश्चिम क्षेत्रिय संघटन मंत्री देवदत्त जोशी, अभाविप पुर्व कार्यकर्ता आणि कै. वामनराव ओक रक्तपेढी सचिव कविता वालावलकर आणि अभाविप कल्याण शहर मंत्री अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कै. वामनराव ओक रक्तपेढी, ठाणे यांच्या देखरेखीखाली झालेल्या या रक्तदान शिबिरात ४१ जणांची नोंदणी झाली त्यापैकी ३५ जणांनी रक्तदान केले व २० जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले होते.
641 total views, 1 views today