डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजयकुमार सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार पालिका हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळयेथील चेकपोस्ट येथे विनाकारण फिरणाऱ्या २५ नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. पालिका उपायुक्त सुधाकर जगताप, `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते,सहायक पोलीस आयुक्त जय मोरे,विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनीसंजय साबळे,पोलीस निरीषक कोळी,वाहतूक पोलीस, पालिका `ह`प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख विजय भोईर,सहाय्यक बाजीराव आहेर यांसह पालिका कर्मचारी यांनी कारवाई केली.
1,049 total views, 2 views today