डोंबिवली – जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्वच्या वतीने ९ गरजू विद्यार्थांची वार्षिक फी भरुन सामाजिक बांधिलकी जपली. शिक्षण प्रसारक मंडळाचे के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली,एमआयडीसी (पूर्व) या संस्थेच्या मुख्याधापिका पाखले यांच्याकडे फीची रक्कम सुपूर्द केली. कोरोना काळात गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जिवलग मित्र परिवाराच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिवलग मित्र परिवार हे पुढील काही दिवसात शिवाई बालक मंदिर या शिक्षण संस्थेतील काही विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे विनय नायर यांनी दिली.
632 total views, 2 views today