“तौक्ते ” चक्रीवादळाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी

ठाणे  – “तौक्ते ” चक्रीवादळाचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी सकाळ पासून जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.

या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत  ठाणे तालुक्यात एक जणांचा मृत्यू व  चार जखमी झालेत . मिरा भाईदर मध्ये एक मृत्यू झाला असून . उल्हासनगर मध्ये एका मृत्यूची नोद झाली आहे व एक जखमी झाले आहे.

तसेच भिवंडी तालुक्यात  एक घर व अंबरनाथ तालुक्यात  पाच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.