नागरिकांनी नोंद घेण्याचे महापालिकेचे आवाहन
ठाणे – कोरोना प्रतिबंधक लसीकरण लाभार्थ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढविला असून पहिल्या डोस घेतल्यानंतर ८५ दिवसानंतरच कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येणार आहे. कोवीन पोर्टलवर या बदलाची नोंद करण्यात आली असून नागरिकांनी ८५ दिवसानंतरच दुसरा डोस घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
कोविशिल्डच्या दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढविल्यास लाभार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढत असल्याबाबत लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाने स्पष्ट केल्यामुळे केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी हा ६ ते ८ आठ्वड्यावरून आता थेट ८५ दिवसांपर्यंत वाढविला आहे. या बदलाची नोंद कोवीन पोर्टलवर करण्यात आली असून पहिला डोस घेतल्यानंतर ८५ दिवसाचा कालावधी पूर्ण केल्या शिवाय दुसऱ्या डोस करिता नोंदणी करता येणार नाही. तसेच कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील कालावधीबाबत काहीही बदल करण्यात आलेला आले नाही. तरी नागरिकांनी या बदलाची नोंद घेवून कोविशिल्डच्या पहिला डोस घेतल्यानंतर ८५ दिवसांनीच दुसरा डोस घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
406 total views, 1 views today