जिल्ह्यात १३६० नवे रुग्ण; तर ५७ रुग्णांचा मृत्यू


ठाणे – ठाणे जिल्ह्यात सोमवारी  रुग्ण संख्या कमी होऊन १३६० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २ हजार १०७ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ८ हजार ५३३ झाली आहे.
 ठाणे शहर परिसरात २३३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २६ हजार ६८७ झाली आहे. शहरात ८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ८१२ झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत ५०२ रुग्णांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १३७ रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ६७ रुग्ण सापडले असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत ७ बाधीत असून १ मृत्यूची नोंद आहे.  मीरा भाईंदरमध्ये १४२ रुग्ण आढळले १० जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ३० रुग्ण आढळले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये  ४२ रुग्णांची नोंद झाली असून १ च्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २०० नवे रुग्ण वाढले आहेत. तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३२ हजार २६८ झाली असून आतापर्यंत ७९७ मृत्यूंची नोंद आहे.

 579 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.