गाडीवर झाड पडले वाहनातून चालकाची सुटका

ठाणे – चक्री वादळाचा फटका आज ठाण्यातही दिसून आला दिवसभर सुरु असलेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडे  उन्मळून पडल्याचे दिसून आले. सोसाट्याचं वारा पावसाचा वेग वाढत गेला. या वादळाचा फटका अनेक झाले उन्मळून पडल्याचेही दिसून आले.  सांयकाळी नौपाडा पोलीस स्टेशन जवळ एका वाहनावर झाड पडल्याची घटना घडली. यावेळी कारमध्ये वाहन चालकही होते. अचानक चालत्या गाडीत झाड पडल्याने वाहनचालक रोहित गायकवाड वाहनात अडकले. या घटनेची माहिती मिळतच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन चालकाला सुखरूप बाहेर काढले.यात चालकाला मार लागला असून त्याला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

 610 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.