किसन नगर भागात लसीकरण सुविधा का नाही?आयुक्त भेटी दरम्यान संजय घाडीगांवकर यांचा सवाल
लवकरच लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
ठाणे – किसन नगर भागात कोरोना लसीकरण सुरू करण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेसचे माजी गटनेते संजय घाडीगांवकर यांनी पालिका आयुक्त यांची भेट घेतली.यावेळी पालिका आयुक्त यांनी लस आल्यानंतर पुरवठा केला जाईल असे आश्वासन आयुक्त यांनी घाडीगांवकर यांना दिले.
किसन नगर भागात नियोजनाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा गोंधळ उडत असून नागरिक अत्यंत त्रासलेले आहेत ,योग्य पध्दतीने लसीकरण केंद्राचे नियोजन करायला हवे अशी मागणी घाडीगांवकर यांनी पालिका आयुक्तांकडे समक्ष भेटून केली आहे.
आयुक्तांना भेटून दिलेल्या पत्रात घाडीगांवकर यांनी म्हटले आहे की,वागळे इस्टेट किसन नगर ३ रोड नंबर १६ येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २३ च्या सुसज्ज ४ हजार चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेल्या हॉलमध्ये किसन नगर ३ ,किसन नगर २ ,रोड न १६ जवळ असलेले पाइपलाइन जवळचे शिवशक्ती नगर ,इंदिरा नगर , नेहरू नगर ,पाईप लाईन झोपडपट्टी जनता वसाहत , किसन नगर ३ ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ हे सर्व निवडणुकाकरिता जसे मध्यवर्ती व जवळचे स्थळ आहे. म्हणून शाळेच्या हॉलमध्ये पंखे ,ट्यूब आणि , २ मोकळे ५०० फुट कार्यालय, हॉलची जागा नैसर्गिक रित्या भरपूर हवेशीर आहे .तसेच शाळा इमारत बाहेर ३००० फुट मोकळी जागेत कार पार्किंग Ambulance पार्किंग होवू शकते .शाळा मुख्य रस्त्याला लागून आहे .मागील पहिला लाटेत घाडीगावकर यांच्या मागणीवरून येथे ठाणे महापालिकेने प्राथमिक लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी दवाखानासह आणि एन्टीजन टेस्ट केंद्र चालू करण्यात आलेले होते याकडे घाडीगांवकर यांनी लक्ष वेधले आहे.श्रीनगर येथील आरोग्य केंद्र आणि कै. गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग होम येथे श्रीनगर ,वारली पाडा ,शांतीनगर ,येथील नागरिकांची प्रचंड गर्दी असते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून तेथील लोकांनाच प्रथम प्राधान्य दिलेले आहे. उपरोक्त शाळेच्या हॉलमध्ये जर कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करण्यात आले तर उपरोक्त किसन नगर २,३ सह परिसरातील असलेल्या सर्व लोकांचे लसीकरण ३० दिवसातच पूर्ण होऊ शकते ( कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून दिल्यावर )आणि कोरोना हॉटस्पॉट ठरलेला हा परिसर भविष्यात कोरोना लागण – प्रसार पासून अलिप्त ठरू शकतो असेही घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.असंख्य नागरिक यामुळे कोरोनाच्या पुढील सर्व येणाऱ्या लाटाचा मारा रोखणे करिता सज्ज असतील.तरी आपण याबाबत तातडीने पावले उचलावी,असे त्यांनी या पत्रात म्हटलेले आहे.
539 total views, 1 views today