लसीकरणाचे ग्लोबल टेंडर राज्य शासनानेच काढावे गटनेते मनोहर डुंबरे यांची मागणी

ठाणे – ठाणे  शहरातील नागरीकांचे लसीकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केली आहे. परंतु हे टेंडर काढण्याची गरजच काय असा सवाल भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यासाठी ग्लोबल टेंडर काढले जाईल असे आश्वासन दिले होते. मग आता महापालिकेने ते टेंडर का काढावे असा सावल उपस्थित करीत या टेंडरला विरोध दर्शविला आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने राज्य शासनानेच संपूर्ण राज्यासाठी ग्लोबल टेंडर काढून पालिकेच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार कमी करावा असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
लसींचा तुटवडा असल्याने सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. परंतु १ मे रोजी यावर बोलतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनचा महापालिकेला विसर पडला का?, त्या टेंडरचे काय झाले असा सवालही डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. ठाणे महापालिकेची आर्थिक  परिस्थिती सध्या नाही. पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने शासनाकूडन येणाऱ्या जीएसटीच्या अनुदानातून पालिका कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात आहेत. तसेच पीएफचे २४० कोटी देखील पालिकेने यापूर्वीच कोरोनावर खर्च केलेले आहेत. त्यामुळे पीएफचे देखील पैसे सध्या पालिकेकडे नाहीत. विकास कामांना देखील ब्रेक लागलेला आहे. त्यात आता तिजोरीत पैसा नसतांनाही पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर कशासाठी काढले जाणार आहे. त्याचा निधी महापालिका कसा उभा करणार?, कर्ज काढण्याची तयारी देखील पालिकेने दर्शविली तरी ते फेडण्याची सध्या ताकद पालिकेकडे आहे का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे.
 त्यातही १ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लसीकरण मोहीमेचा वेग वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी लवकरच ग्लोबल टेंडर काढले जाईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचा महापालिकेला विसर पडला आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य शासनानेच अशा प्रकारे टेंडर काढून पालिकेच्या तिजोरीवरील भार हलका करावा अशी मागणीही डुंबरे यांनी केली आहे.

 333 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.