“ताउत्के” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

अलिबाग – “ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.
 या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी ११.०० वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
 आतापर्यंत एकूण २३.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील १ हजार १०४ घरांचे अंशत: नुकसान तर १ घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचाही मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 जिल्ह्यातील एकूण २ हजार २९९ कुटुंबांचे मिळून एकूण ८ हजार ३८३ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

 297 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.