वाऱ्यासह झालेल्या पावसात ५९ वृक्ष उन्मळले, अनेक वाहनांचे घरांचे नुकसान

ठाणे -चक्रीवादळाचा फटका ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. शहरात रात्नी बसून वाऱ्या सह पावसाला दमदार सुरवात झाली. सोमवारी दिवसभर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात ५९ वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांसह घरांचेही नुकसान झाले. तर २१ ठिकाणी वृक्षाच्या फांद्यादेखील पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवतहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील दोन ठिकाणी दोन इमारतींचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. परंतु यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. तर दिवसभरात ९२ मीमी पावसाची नोंद शहरात झाली. तर सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत देखील झाला होता. तसेच तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.चक्रीवादाळामुळे झालेल्या पावसाने ठाण्यातील तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कोरम मॉल जवळील नितिन कंपनी, उजिर्ता हॉटेल, कोर्टनाका आणि अपना नगर राबोडी महापालिका शाळेजवळ पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ठाणो महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा गेट देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून वाचू शकलेला नाही, या गेटवर असलेली कमानच गेटवर पडून कमान आणि गेटचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
विविध ठिकाणी पडलेल्या वृक्ष उचलण्याचे काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या हानित चारचाकी वाहनांसह दुचाकीचे ही नुकसान झालेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांवर देखील वृक्ष पडल्याचे दिसत आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तर ५९ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय सहा ठिकाणी वृक्ष व धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून आला आहे. यासंदर्भात संबंधित रहिवाशांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. दुसरीकडे चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या वतीने आजचे लसीकरण बंद करण्यात आले आहे.


 418 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.