डॉ.राजू भावडू रोझोदकर यांना इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी बहाल

डोंबिवली – डॉ.राजू भावडू रोझोदकर यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी नुकतीच संपादन करण्याचा मान मिळविला आहे. रविदासांचे `सामाजिक धार्मिक कार्याचे ऐतिहासिक महत्व`या विषयावर आर.वी.रोझोदकर यांनी व्ही.जी.वझे कॉलेज,मुलुंड,मुंबई महाविद्यालयाच्या इतिहास संशोधन केंद्रातून संशोधन केले असून या केंद्रामार्फत आपला उपरोक्त विषयावर मुंबई विद्यापीठास प्रबंध सादर केला.आर.बी.रोझोदकर यांना बहुआयामी व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ.व्ही.के.खाडे यांनी मार्गदर्शन केले.आर.बी.रोझोदकर हे सध्या ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, ठाणे येथे गटप्रमुख या पदावर असून ३६ वर्षापासून ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, ठाणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी एम.ए. (इतिहास, मराठी), एम.एड. आणि एल एल. बी. या पदव्या मिळविल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. किशोर गायकवाड, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. व्ही. के.खाडे, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. लांब, इंद्रराज आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, सिल्लोड, प्रा. डॉ. उमेश कदम, जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालय, नवी दिल्ली प्रा. डॉ. बिंदा परांजपे, इतिहास विभाग प्रमुख बनारस हिंदू विश्व विद्यालय, वाराणसी, उत्तर प्रदेश प्रा. डॉ. प्रिता निलेश, वझे केळकर, मुलुंड महाविद्य सचिव डॉ. एम.आर.कुरूप यांचे डॉ. आर.बी.रोझोदकर यांनी खास आभार मानले आहेत.

महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने अध्ययन अध्यापनाचे काम करीत असतांना डॉ. रोझोदकर प्रभावित झाले. गुरु रविदासांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अछूत कौन थे और अछूत कैसे बने’ हा ग्रंथ समर्पित केला.त्यांच्या समतावादी विचारसरणीने त्यांना आकर्षित केले. भारतीयांपर्यंत त्यांच्या वाणीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सामाजिक सहकार्यांच्या सहकार्याने ‘भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन BRCF या संस्थेची स्थापना केली. भारतभर काम करीत असतांना गुरु रविदासांचे कार्य समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे स्वयं स्पष्ट लेखन होणे त्यांना गरजेचे वाटले. गुरु रविदासांच्या सामाजिक धार्मिक कार्याचे लेखन होऊन त्यांच्या विचारांचा भारतीय समाजावरील प्रभाव यांवर संशोधन करून त्यांनी समाजाला एक नवी दिशा दिली आहे. भगवान रविदासांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ही पदवी प्राप्त केली.यात त्यांचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.व्ही.के.खाडे यांचे सहकार्य व बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कालकथित भीमाबाई भावडू रोझोदकर आणि भावडू नागो रोझोदकर यांच्या आशिर्वादाने आणि प्रा.डॉ.दीपक बनसोड, प्रा.डॉ. किरण चव्हाण, प्रा. डॉ. बालकवी सुरंजे, प्रा. रुपवते, प्रा. कृष्णा गायकवाड आणि नरेश बाळज यांच्या सहकार्याने त्यांनी आपले संशोधनकार्य पूर्ण केले आहे.विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

 387 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.