काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं आज १६ मे २०२१ रोजी पहाटे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटल मध्ये  निधन झालं. 

ठाणे – राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून बरं वाटत नव्हतं. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी करून घेतली. २२ एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल आला होता. त्यात सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २३ एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले.  उपचारानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, २५ एप्रिलला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होतं. त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला होता.

त्यांच्या शरीरात सायटोमेगॅलो हा नवीन व्हायरस आढळला होता. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले असून या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजीव टोपे यांनी शनिवारी १५ मे २१ दिली होती.

काय आहे सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus)

सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेतील ४० वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळून येतो. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कडे लाळ किंवा थुंकी द्वारे प्रसारित होतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.


४५ वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.राजीव सातव याच्या जाण्याने माझा जिवलग मित्र गमावला अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या शोकसंदेश व्यक्त केल्या आहेत.   

 287 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.