कोरोनात वंजारी समाज ठरतोय अन्नदाता,आतापर्यंत ३००० हजार गरजूंना मोफत जेवणाचे डबे

ठाणे – वंजारी समाजाने कोरोना काळात घाबरण्याची गरज नाही असा धीर देऊन आम्ही आहोत आपल्यासाठी अशी आपुलकीची साद या संकटात त्यांनी ठाणेकरांना दिली आहे. ज्या लहान मुलांचे आईवडील कोरोनाचे उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यासाठी तसेच जे ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या परिस्थितीत जेवण बनवू शकत नाहीत,अशांसाठी व गोरगरीब नागरिकांसाठी दोन वेळच्या मोफत जेवणाच्या डब्याची सोय समाजाने केली आहे. आतापर्यंत १६ दिवसात ३००० गरजूंना मोफत जेवणाचे डबे वाटप करण्यात आले असून पुढेही ही सेवा सुरू राहणार आहे.रविवारी १६ मे रोजी अखिल भारतीय वंजारी युवा संघटना संस्थापक धनराज गुट्टे, वंजारी सेवा संघ प्रदेश अध्यक्ष अनिल फड यांच्या हस्ते जेवणाचे डबे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने अनेक रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईक आपल्या रुग्णाच्या चिंतेत उभे असतात त्यांचे जेवणाचे हाल होऊन नये म्हणून वंजारी समाजाने पुढाकार घेतला असून त्यांना दोन वेळच्या मोफत जेवणाच्या डब्याची सोय समाजाने केली आहे.या जेवणाच्या डब्यात चार चपाती,भात, वरण,एक सुकी भाजी आणि गोड पदार्थाचा असणार आहे. वऱ्हाडी मिसळचे गजानन आंधळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला असून  त्याला ठाणेकरांनी व समाज बांधवानी चांगली साथ दिली आहे.ज्या गरजुंना मोफत जेवणाचा डबा हवा असल्यास त्यांनी ९९२०१५५४६० या नंबरवर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे .

या उपक्रमासाठी गजानन आंधळे,शिवाजी वाघ,विजय सांगळे,अविनाश सांगळे,संदीप चकोर,सहदेव जायभाये,दीपक नागरे,राजकुमार माने,गणेश खराबे,सुरेश गर्कळ, नयन खारडे, आदींचे सहकार्य लाभत आहे.तसेच चार रिक्षाचालकांनी या उपक्रमासाठी आपली रिक्षा सेवा मोफत दिली आहे.

 281 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.