चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी सुरू महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे –  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत असल्याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्यानंतर आज सकाळपासून होर्डिंग्जची सुरळीत तपासणीचे काम सुरू आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ मुंबई तसेच  नजीकच्या समुद्रातून जाणार असून त्याचा प्रभाव हा काही प्रमाणात मुंबई, ठाणे येथील वातावरणावर होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वेगाने वारे वाहण्यासह पर्जन्यवृष्टी देखील होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी उभे करण्यात आलेले होर्डिंग चक्री वादळामुळे पडून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत आहेत का याची तपासणी करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार प्रभाग समिती निहाय शहरातील होर्डिंगची तपासणी करण्याचे काम आज सकाळपासून सुरू आहे.

 607 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.